चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कालुस्ते मावळतवाडी ते बौद्धवाडी विहारपर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात भूमीपूजन झाले.
यावेळी कालुस्तेच्या सरपंच जीया कदम, उपसरपंच अजित घाग, ग्रामपंचायत सदस्य संदेश पवार, ग्रामपंचायत सदस्य सुरज कदम, ग्रामपंचायत सदस्य अस्मिता पवार, मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, सक्रेटरी सुहास पवार, स्वप्नील पवार, कुणाल मोहिते, शशिकांत पवार, रामदास पवार, रामदास कदम, भरत कदम, शशी साळवी, गौतम कदम, जयराम पवार, सत्यवान खरात, शैला खरात, स्विटी पवार, रोशनी पवार, विशाल जाधव, शैलेश जाधव, दिलीप पवार, जयराम पवार, विलास कदम, सुशील पवार, रेखा पवार, सुशिला पवार, मंगला पवार सायली आचरेकर, प्रफुल्ल पवार, मनोज कदम, सामाजिक कार्यकर्ते रमण डांगे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अधिकारी गणेश कदम यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रशांत यादव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मावळतवाडी येथील ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी सहकार्य केल्याबद्दल बौद्धवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचेही आभार मानण्यात आले.












