साटवली भंडारवाडी येथील घटना, दारूचा मुद्देमाल जप्त
लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे लांजा पोलिसांनी धाड टाकून विनापरवाना विदेशी तसेच गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. या घटनेत विदेशी तसेच गावठी हातभट्टीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई सोमवारी २ जून रोजी रात्री ८.१५
करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साटवली भंडारवाडी येथे एक महिला विनापरवाना गावठी तसेच विदेशी दारूची विनापरवाना विक्री करत असल्याची खबर लांजा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांच्या पथकाने सोमवारी २ जून रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास साटवली भंडारवाडी येथे धाड टाकली. यावेळी सौ. दीप्ती दिनेश आंबोळकर (वय ४६, राहणार साटवली भंडारवाडी) ही महिला विदेशी तसेच गावठी हातभट्टीच्या दारूसाठ्यासह आढळून आली. या धाडीत पोलिसांनी ७८० रुपये किमतीचे बाॅब्स
लेमन होडका लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या २६ प्लास्टिक बाटल्या तसेच ६९० रुपये किमतीच्या हनी ब्लेंड प्युअर लेबर असलेल्या १८० मिली मापाच्या २३ प्लास्टिकच्या बाटल्या ३०० रुपये किमतीच्या हायवर्ड फाईन व्हिस्की लेबल असलेल्या १८० मिली मापाच्या १० प्लास्टिकच्या बाटल्या हे विदेशी मध्य त्याचप्रमाणे ७५० रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू असा एकूण २५२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे .
विनापरवाना विदेशी तसेच गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी संबंधित महिलेवर लांजा पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड या करत आहेत.












