रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील निवेंडी येथील उघड्या घरात प्रवेश करत अज्ञाताने तब्बल साडे तीन लाखांचे दागिने लांबवले. चोरीची ही घटना 2 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत घडली आहे.
याबाबत अरुणा पर्शुराम घाग (62,रा.भगवती नगर निवेंडी,रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या निवेंडी येथील उघड्या घरामध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश करत खोलीतील कपाटामधील सोन्याच्या बांगड्या,कर्णवेली,कानातील कुडी,सोन्याची चेन असा एकूण 3 लाख 51 हजार 960 रुपयांचा ऐवज लांबवला










