रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या साखरतर पुलाजवळ बेकायदेशिरपणे टर्की नावाचा अंमली पदार्थ जवळ बाळगणार्या संशयिताला शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली.त्याच्याकडून 9 हजार 460 रुपयांचा 2.68 ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला.
उजेफा अब्दुल हमिद साखरकर (34,रा.साखरतर रहमत मोहल्ला,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.शनिवार 3 जून रोजी रात्री 10 वा.शहर पोलिसांचे पथक साखरतर येथे गस्त घालत होते.तेव्हा तेथील पुलाच्या पुढे उजव्या बाजुला असलेल्या एसटी स्टॉपच्या पडीक शेडमध्ये उजेफा आपल्या ताब्यात अंमली पदार्थ बाळगलेला पोलिसांना मिळून आला.पोलिसांनी त्याची चौकशी करुन झडती घेतली असता त्याच्याकडे एक पारदर्शक प्लॅस्टिक पाउच होता. त्यात खाकी रंगाचा उग्र वास असलेला टर्कि हा 2.68 ग्रॅम अंमली पदार्थ मिळून आला.याप्रकरणी उजेफा विरोधात एनडीपीएस अॅक्ट 1985 चे कलम 8 (क),22 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.