दोघांवर कारवाई

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश वाहतूक व कत्तल होत असल्याचा दावा नेहमीच सकल हिंदू समाजाकडून केला जातो. याला पुष्टी मिळत असून ग्रामीण पोलिसांनी रत्नागिरी तालुक्यातील खानू पेट्रोल पंपाजवळ गोवंशाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे.
नुकतेच एकता मार्ग येथील अपार्टमेंटच्या वॉचमनकडे गोवंशाचे मांस सापडले होते ल. त्यामुळे सकल हिंदू समाज आक्रमक झाला होता. अशा प्रकारचे गुन्हे पोलीस गांभीर्याने घेत नाही, १० महिन्यात असे अनेक गुन्हे घडले पण प्रमुख आरोपी पकडले गेले नाहीत अशा भावनाही सकल हिंदू समाजाने बोलून दाखवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक, नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने दि. 05 मे रोजी रात्री ११ वाजताचे दरम्यान रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दी मधील मुंबई-गोवा महामार्गा वरील खानु पेट्रोल पंप येथे रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नियमित गस्ती दरम्यान एक संशयित टॅम्पो पकडण्यात आला. त्या टॅम्पो हौद्याची तपासणी केली असता त्यामध्ये पाच बैल जवळजवळ बांधलेले दिसून आले.
दोन पंचांसमक्ष गाडीवरील चालकाचे नांव गाव विचारता त्याने आपले नांव राहुल आनंदा सावंत (वय-23 वर्षे रा. बोरपाडळे ता. पन्हाळा जि. कोल्हापुर) असे सांगितले. तर त्या टेम्पो मधील ऋषिकेश आनंदा सावंत (वय-26 वर्षे रा. बोरपाडळे ता. पन्हाळा जि. कोल्हापुर) हा दुसरा व्यक्ती होता.
पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता बैल खरेदी केल्याची पावती व त्यांची वैद्यकिय तपासणी केलेली नसल्याचे आढळून आले तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे खाद्य व पाण्याची व्यवस्था न करता त्यांना वेदना व यातना होतील या रीतीने दोरीने बांधून कत्तली करीता वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले म्हणून या दोन्ही इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आहे तसेच त्यांच्यावर रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाणे येथे याबाबत गुन्हा रजि. नं. 108/2025 प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (अ) (ड) (ई) (फ) (एच) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (अ) (ब), 9 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119, व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 चे कलम 125 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्या मध्ये खालील दोन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी 1) राहुल आनंदा सावंत वय-23 वर्षे रा. बोरपाडळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर, 2) ऋषिकेश आनंदा सावंत वय-26 वर्षे रा. बोरपाडळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर तसेच 3) ₹ 6 लाख रुपये किंमतीचा एक सफेद रंगाचा टाटा कंपनीचा 407 टॅम्पो क्रमांक एम.एच-14-एच.यु-5406 व जप्त करण्यात आलेला आहे.
या वाहनातून एकूण ₹ 38,000/- किमतीचे 5 गोवंश बैलांची सुटका करण्यात आलेली आहे.
ही, कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्री. नीलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र यादव, व खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
1) पो.उ.नि. श्री. चव्हाण, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे,
2) सपोफौ/1129 श्री. सावंत, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे
3) सपोफौ/253 श्री. कांबळे, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे
4) मपोहवा/1274 श्रीमती. सावंतदेसाई, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे व
5) पोशि/142 श्री. पाटील, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे.











