कोका-कोला विरोधात स्थानिक आक्रमक, भुमिपूत्रांना नोकरी मिळावी यासाठी मूकमोर्चा

मनाई आदेशा चा भंग ४५० हुन अधिक जणांवर गुन्हा 

खेड (प्रतिनिधी)लोटे औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित कोका कोला प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळावे, या मागणीसाठी असगणी ग्रामस्थांनी गुरुवारी शांततापूर्ण पण ठाम असा मुक मोर्चा काढला. हातात काळे झेंडे घेऊन ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि कंपनीविरोधात निषेध व्यक्त करत लोटे औद्योगिक क्षेत्रातून मोर्चा काढला.

 

 

हा मोर्चा असगणी ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू झाला आणि औद्योगिक वसाहतीतून फिरून परत ग्रामपंचायतीपाशी शांततेत संपन्न झाला. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर फूड वर्कर्स’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आणि असगणी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

 

ग्रामस्थांनी नोकरभरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील लोकांना नोकऱ्या दिल्या जात आहेत,” असा आरोप ग्रामस्थांनी केला. कोकणातील हा एक मोठा औद्योगिक प्रकल्प असून, त्यामुळे स्थानिक युवकांमध्ये रोजगाराबाबत आशा निर्माण झाली होती. मात्र, त्या आशांवर पाणी फिरल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे.

 

 

चौकट

 

दरम्यान या प्रकरणी संजना संजय बुरटे (सरपंच)

यासिन फरीक घारे (उपसरपंच),

प्रमोद पांडुरंग चांदिवडे (सदस्य) चंद्रकांत राजाराम गोसावी (सदस्य) सुविंद्र रामचंद्र धाडवे (सदस्य) शाहिन इस्माईल कादरी (सदस्य) रिया सचिन बाईत (सदस्य) मेघना भाऊ नायनाक (सदस्य) चेतन चंद्रकांत पवार संजय सखाराम बुरटे (माजी उपसरपंच) अनंत विठ्ठल नायनाक (माजी सरपंच) १ ईस्माइल हसन कादरी (शाखा प्रमुख शिवसेना शिंदे गट हुसेन करीम ठाकुर (माजी सरपंच), विवेक वासुदेव नायनाक जावेद जब्बार आंबेडकर रविंद्र सखाराम बुरटे रविना रविंद्र बाईत (माजी सरपंच) श्रीकांत आत्माराम फडकले संजय आंब्रे (आय.यु.एफ.संघटनासदस्य) उस्मान हसन झगडे गंगाराम धोंडु इप्ते (दक्षता समिती अध्यक्ष) संजय

तुळशीराम मोहीते व अज्ञात ४०० ते ४५० पुरुष व महिला यांच्यावर बेकायदेशीर जमाव व मनाई आदेशा चा भंग केल्या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे