९ रोजी श्री सूर्यनारायणा चा वर्धापन दिन

माखजन :संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथे श्री सूर्यनारायण मंदिरात ९ रोजी मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन साजरा होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत

सकाळी सौरलघुरुद्र,आरती मंत्रपुष्प,कीर्तन,महाप्रसाद,असे कार्यक्रम होणार आहेत.मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष अशोक पोंक्षे यांनी केले आहे