कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण वेगळं नातं; ते कधीच तुटू शकत नाही!

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा; सदैव तुमच्या सोबत असेन- आमदार निलेश राणे

*चिपळूण (संतोष सावर्डेकर):–* कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण वेगळं नातं आहे, ते गावा-गावातून कधीच तुटू शकत नाही. गावातील लोकांना धनुष्यबाण माहित आहे. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माहित आहेत. यामुळे लोकं स्वतःहून शिवसेनेत येत आहेत. तेव्हा लोकांची कामे झाली पाहिजेत. या दृष्टीने काम करा आणि शिवसेना प्रमुख नेते ना. एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून भेट द्यायची आहे, तेव्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान शिवसेना चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयात झालेल्या सत्कार प्रसंगी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले. शिवाय तुम्ही कधीही मला हाक मारा, आपण तुमच्यासोबत सदैव उभा राहू, अशी ग्वाही आ. राणे यांनी यावेळी दिली.

 

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आ. निलेश राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी तालुकाप्रमुख संदेश आयरे, शहर प्रमुख उमेश सकपाळ यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आ. राणे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

 

यानंतर आ. निलेश राणे यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा. पक्ष मजबूत करा. आपण कडवट शिवसैनिक पदाधिकारी आहात. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी तुमचा भाऊ आहे. तुमच्या कुटुंबातील आहे. मी तुम्हाला आपल्या कुटुंबातील समजतो. मी तुमच्या कुटुंबातील आहे, असे समजून मला कधीही हाक मारा, मी तुमच्या पाठीशी १०० टक्के सदैव उभा असणार आहे, अशी ग्वाही आ. राणे यांनी यावेळी दिली.

 

ते पुढे म्हणाले की, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर आभार दौऱ्या दरम्यान शिवसेना प्रमुख नेते ना. एकनाथ शिंदे यांनी कठीण प्रसंगावर मात करत ते उशिरा आभार दौऱ्यात पोहोचले. याची आठवण करून देताना शिवसेना प्रमुख नेते ना. एकनाथ शिंदे यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. गेली दहा वर्षे आपल्या कपाळाला गुलाल लागला नव्हता. ते तुमच्यामुळे शिवसेना पक्षामुळे लागला असे, आपण आभार दौऱ्यात शिंदे साहेबांना सांगितले. यामुळे शिवसेना पक्षाचे उपकार आयुष्यात कधीच विसरणार नाही, असे सांगताना चिपळूणमुळे आपल्याला ओळख मिळाली. ही ओळख गेली दहा वर्ष टिकवण्यामध्ये चिपळूणने मोठे सहकार्य केले, अशा शब्दांत आपली भावना आमदार निलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केली.

 

आपलं कोणाशी मनापासून वैर नव्हते. आपणही कुणी ठेवू नका. विचारात मतभेद होऊ शकतात. परंतु संबंधामुळे कधीही वैर येता कामा नये. ते आजपर्यंत आम्ही पाळले आहे. शिवसेना गावा- गावात पोहोचवायचे आहे शिवसेना वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात आपली जी इमेज तयार केली आहे. त्यामुळे लोक शिवसैनिक येत आहेत. शिवसेनेत शिवसैनिक पदापेक्षा इतर कोणतेही पद मोठे नाही, असे सांगताना आपण जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा मूळ पक्षात आलो आहे. मूळ विचारधारेत आलो आहे, अशी भावना निर्माण झाली. दोन पराभव झाले. मात्र, आता शिवसेनेमुळे विजयाची संधी मिळाली आहे, असे शेवटी सांगितले.

 

यावेळी तालुकाप्रमुख संदेश आयरे यांनी प्रास्ताविक केले. तर उमेश सकपाळ यांनी आपल्या मनोगतात चिपळूण शहरातील समस्या मांडताना मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम सुरू असून पूर्वी बहादूरशेखनाका ते कामथे असा उड्डाणपूल होणार होता. मात्र, आता प्रांत कार्यालयापर्यंत झाला आहे आणि तिथे अंडरपास दिला गेला असून यामुळे पाग येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. तरी या विषयात आपण लक्ष घालावे, अशी मागणी सकपाळ यांनी आ. राणे यांच्याकडे केली.

 

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले,दिलीप चव्हाण, युवासेना तालुकप्रमुख निहार कोवळे, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, माजी नगरसेवक महम्मद फकीर, माजी नगरसेवक करामत मिठागरी, उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, प्रमोद बुरटे विकी लवेकर, संदेश गोरिवले, नयन चव्हाण, अमेय चितळे, सुजित पाकटे, मंगेश कदम, अर्जुन शिंदे, शुभम पिसे, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे, दयानंद जुवळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. रश्मीताई गोखले, शहराध्यक्षा सौ. प्राजक्ता टकले, सौ. राणी महाडिक, सौ. प्रिया शिंदे, सौ. आरती महाडिक, सौ. सुवर्णा साडविलकर, सौ. तृप्ती कदम, सौ. दिशा किंजळकर, सौ. पूर्वा तांदळे, सौ. श्रद्धा कदम आदी उपस्थित होते.

 

चौकट

 

*आ. निलेश राणे यांच्याकडून शहरप्रमुख उमेश सकपाळ यांचे भरभरून कौतुक*

 

आमदार निलेश राणे यांनी आपल्या मनोगतात चिपळूण शहर प्रमुख उमेश सकपाळ यांचे भरभरून कौतुक करताना पूर्वी मी तुम्हाला नेहमी त्या बाजूला बघितले आहे. आज बाजूला बसला आहात. तेव्हा तुमची काम करण्याची पद्धत आवडायची आपली तळमळ अनेक वर्षापासून बघतोय. आपण समाजासाठी लोकांच्या हितासाठी जे प्रश्न उचलत आलात. याबद्दल आपले मनापासून कौतुक आहे, अशा शब्दात सकपाळ यांचे राणे यांनी कौतुक केले.