ठाकरे बंधूंनी बॅट बॉलने खेळाव की बॅडमिंटनने हा त्यांचा प्रश्न 

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या वृत्तावर आ. निलेश राणे यांचे मार्मिक उत्तर

चिपळूण (प्रतिनिधी):– ठाकरे बंधूनी एकत्र यावं किंवा नाही. हा त्यांचा प्रश्न आहे. बॅट- बॉल खेळावं की बॅडमिंटन खेळावं, हा त्यांचा प्रश्न! अशा शब्दात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना खिल्ली उडवली. ते काही असो, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मोठ्या फरकाने जिंकणार, असा विश्वास कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी चिपळूण दौऱ्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.

 

शिवसेनेचे आमदार निलेश राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तर यावेळी नागरिकांची निवेदने स्वीकारून प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, पत्रकारांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर राणे म्हणाले की, ज्यांना कोणाला भीती वाटत असेल आणि ते एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार ? असा सवाल उपस्थित केला. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामा संदर्भात ते म्हणाले की, लोकांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार नारायण राणे यांनी लक्ष घातले असून ते केंद्रीय मंत्री ना. गडकरी यांच्याशी चर्चा करीत आहेत. या प्रश्नाबाबत लवकरच तोडगा काढण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत, असे स्पष्ट केले.

 

गोवंश व वाहतुकी संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार निलेश राणे म्हणाले की, हा मुद्दा मागील दोन अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवंश तस्करी प्रकरणी जे लोक दोन-तीन वेळा मिळून येतील, तेव्हा या लोकांवर मोक्का लागू शकतो, असे सांगितले आहे. गोवंश व गोहत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रातील रॅकेट मोडावे लागेल, असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संदेश आयरे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, दिलीप चव्हाण, युवासेना तालुकप्रमुख निहार कोवळे, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, माजी नगरसेवक महम्मद फकीर, माजी नगरसेवक करामत मिठागरी, उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, प्रमोद बुरटे विकी लवेकर, संदेश गोरिवले, नयन चव्हाण, अमेय चितळे, सुजित पाकटे, मंगेश कदम, अर्जुन शिंदे, शुभम पिसे, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे, दयानंद जुवळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. रश्मीताई गोखले, शहराध्यक्षा सौ. प्राजक्ता टकले, सौ. राणी महाडिक, सौ. प्रिया शिंदे, सौ. आरती महाडिक, सौ. सुवर्णा साडविलकर, सौ. तृप्ती कदम, सौ. दिशा किंजळकर, सौ. पूर्वा तांदळे, सौ. श्रद्धा कदम आदी उपस्थित होते.