आचरा व्यापारी संघटना आणि देवूळवाडी पर्यावरण प्रेमी ग्रामस्थांतर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण

आचरा–अर्जुन बापर्डेकर :वृक्ष मानवाशिवाय जगू शकतात वृक्षांशिवाय मानवी जीवन अशक्य याउक्तीस अनुसरून पर्यावरण संवर्धनाची जागृती व्हावी,मोकळ्या स्मशानभूमी परीसरात वृक्ष वाढ व्हावी या उद्देशाने आचरा व्यापारी संघटना आणि देवूळवाडी पर्यावरण प्रेमी ग्रामस्थांकडून आचरा देवूळवाडी स्मशान भूमीत आंबा रोपांची लागवड केली गेली. आचरा सरपंच आणि व्यापारी संघटनेचे मार्गदर्शक जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ केला गेला.यावेळी व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, सचिव पंकज आचरेकर, खजिनदार जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, भरत पटेल, रोहिदास पेंडूरकर,दिपक मेस्त्री, शशिकांत शेवरेकर, आडवलकर, यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.