कोकण रेल्वे मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

दिवाणखवटी-रेल्वेस्थानकच ‘टार्गेट’; महिलांच्या मंगळसूत्रांसह सोनसाखळी हिसकावण्याचे सत्र पुन्हा सुरू

खेड(प्रतिनिधी)कोकण मार्गावर रेल्वेगाडधांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचे पुरते धीडवडे निघत आहेत. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. कोकण मार्गावरून धावणारी तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटत्तिस्ट वर आहे. तालुक्यातील दिवाणखवटी रेल्वेस्थानक चोरट्यांनी ‘टार्गेट’ केले आहे. दोन महिन्यात या एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या तब्बल सहा महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे हिसकावत चोरट्यांनी ७ लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे

 

यापूर्वी चोरट्यांनी जलद गतीने धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसला ‘लक्ष्य’ केले होते. कोकण मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून महिलांचे दागिने हिसकावण्याचे प्रकार थांबलेले असतानाच चोरट्यांनी आता तुतारी एक्सप्रेसला लक्ष्य केले आहे. मुंबईहून कोकणात येणारी तुतारी

एक्सप्रेस पहाटेच्या सुमारास क्रॉसिंगसाठी दिवाणखयटी रेल्वेस्थानकाजवळ थांबते. याचदरम्यान, प्रवाशी विशेषतः महिला गाढ झोपेत असतात. हीच संधी साधत चोरटे महिलांच्या गळ्यातीत दागिने हिसकावून पोबारा करतात. दिवाणखवटी स्थानकाजवळ पलायनासाठी अनेक मार्ग देखीत असल्याचे समोर आले आहे. रेल्वेस्थानकालगतच जंगलमय भागही असल्याने दागिने लांबवल्यानंतर याच जंगलातून चोरटे पसार होत असल्याचे समजते. यामुळे चोरट्यांचा सुगावा लागत नसल्याची बाचतही समोर आली आहे. दोन महिन्यात तुतारी एक्सप्रेसमधून प्रयास करणाऱ्या चार महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा केला. या चारही घटना दिवाणखवटी रेल्वेस्थानकाजवळ च

तुतारी एक्सप्रेसमध्येच घडल्या आहेत. पहाटे २.४० ते ३ वाजण्याच्या सुमारास पडलेल्या घटनांनी महिला प्रवाशांची झोप उडाली आहे.

 

दोनच दिवसापूर्वी सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या २ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावत पुन्हा यत्रणांना चकवा देण्याचा प्रयत्न केला आहे. तुतारी एक्प्रेसमध्ये सर्रासपणे घडणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांनी तपास यत्रणा सतर्क झाल्याची शक्यता गृहित घरत लक्ष विचलित करण्यासाठीच सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेसला ‘टार्गेट’ करत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला.