खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील शेलारवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील गणवाल मधील १५ प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पर्यायी शेतजमीन मिळण्याकरता भूसंपादनाचा मोबदला वाटप वेळी मिळालेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या ६५ टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ४५ दिवसाच्या मुदतीमध्ये भरली असताना १७ वर्षे उलटून गेली तरीही आजपर्यंत पर्यायी शेत जमिनीही मिळालेली नाही आणि पुनर्वसन पॅकेज दिलेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केवळ कागदोपत्री माहिती मागवण्याचेच काम चालू आहे.
धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पर्यायी शेत जमीन हवी असल्यास प्रकल्पग्रस्तांना बुडीत क्षेत्रातील भूसंपादनाचा मोबदला मिळते वेळी जमिनीच्या मोबदल्याच्या ६५ टक्के रक्कम ही जिल्हाधिकारी कार्यालयात ४५ दिवसाच्या आत भरावी लागते शैलारवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पामधील बुडीत क्षेत्रातील गणवाल मधील १५ प्रकल्पग्रस्तांनी गणवाल मधील भूसंपादनाचा मोबदला अदा करतेवेळी जमि नीच्या मोबदल्यातूनच ६५ टक्के रक्कम कमी करून मोबदला स्वीकारला. त्यातील दोन प्रकल्पग्रस्तांचाही मोबदला वाटपाच्या वेळी जमिनीच्या मोबदल्याच्या रक्कम कमी करून मोबदला स्वीकारला आहे. परंतु हे दोन प्रकल्पग्रस्त मुदतीत आहेत तरीही त्यांना मुदतीबाहेर पैसे भरल्याची पुनर्वसन कार्यालयाकडून कारणे दाखवली जात आहेत.
लाभ क्षेत्रामध्ये पर्यायी जमीन संपादित करताना तेथील जमीन धारकांची शासनाने घातलेल्या निर्बंधानुसार जमीन संपादित करून त्याचे वाटप बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना केले जाते. याबाबतची माहिती मागवली असता शेलारवाडी धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये येणाऱ्या गावातील माणि, लवेल सवेनी, ऐनवरे, हेदली, वेरळ या गावांमधील केवळ १३ हेक्टर क्षेत्र प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्याकरता पूर्वी उपलब्ध होते मात्र १५ प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात पण जमीन उपलब्ध नसल्याने प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी जयराम तुकाराम आंब्रे यांनी वेळोवेळी जिल्हाधिकार्यालय व मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार केला
मात्र १५ प्रकल्पग्रस्तांना देय जमीन उपलब्ध नाही, असे कारण दाखवत १९९९च्या पुनर्वसन कायद्यातील कलम १४ नुसार पॅकेज स्वीकारा असे सांगण्यात आले. दरम्यानं प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी श्री जयराम तुकाराम आंब्रे यांचे नुकतेच निधनही झाले मग प्रकल्पग्रस्तांना न्याय मि ळणार कधी असा प्रश्न पडला आहे.











