शिक्षकांच्या बहुचर्चित वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची सांगता

योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची परिक्षेवेळी भेट

गौरव पोंक्षे माखजन

रत्नागिरी येथे सध्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे तर्फे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचे मार्फत सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीची दहाव्या दिवशी सांगता झाली.दहाव्या दिवसाच्या शेवटी झालेल्या लेखी परिक्षेवेळी योजनाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी भेट दिली.व प्रशिक्षण प्रक्रियेचे कौतुक केले.

हे प्रशिक्षण रत्नागिरी येथील फाटक हायस्कुल व पटवर्धन हायस्कुल येथे झाले.ह्या प्रशिक्षणात प्रा सागर पोकळे,प्रा प्रभात कोकजे,प्रा सौ मानसी गानू,प्रा सुनील जोपळे,दिगंबर घवाळी,विभा बाणे,सुधीर शिंदे,मोहन बापट,अनंत जाधव,विष्णू पवार आदींनी मार्गदर्शन केले.तर संपूर्ण प्रशिक्षण हे डाएट चे प्राचार्य सुशील शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. समन्वयक म्हणून राहुल बर्वे,राजेंद्र लठ्ठे यांनी काम पाहिले.तर सौ अश्विनी काणे यांनी साधनव्यक्ती म्हणून काम पाहिले.

शिस्तबद्ध पद्धतीने प्रशिक्षण पूर्ण झाल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.