पावसाळ्यात काम केल्याने कामाचा दर्जा काय राहणार? लोकांचा सवाल
लांजा (प्रतिनिधी) : खड्डेमय बनलेल्या लांजा शहरातील साठवली तीठा ते लांजा हायस्कूलच्या पुढील भागापर्यंतच्या अंतरात गुरुवारी सायंकाळी डांबरी करण करण्यात आले. मात्र पावसाळ्यात करण्यात आलेल्या डांबरीकरणाचे काम अवजड वाहनांमुळे कितपत टिकून राहील? आणि कामाचा दर्जा राहील का असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
लांजा शहरातील सर्विस रोडची पार दुरावस्था झाली आहे होती. साठवली तिठा लांजा हायस्कूल ते कुणबी पतसंस्थेपर्यंत च्या अंतरामध्ये चालणे सोडाच परंतु वाहन चालवणे देखील कठीण होऊन बनले होते. त्यातून वाट काढताना पादचारी आणि विशेषता लांजा हायस्कूलच्या मुलांची पूरती दमछाक होत होती. तर ठाकरे गटाचे युवा सेना अधिकारी अभिजीत राजे शिर्के यांनी 15 ऑगस्ट रोजी सर्विस रोडवर चिखल नांगरणी स्पर्धा घेण्याचे आव्हान दिले होते.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाकडून घाई गडबडीत सर्विस रोड च्या डांबरीकरणाचे काम गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. मात्र पावसाळ्यात हे काम करण्यात आल्याने त्याचा दर्जा टिकून राहील का? आणि महामार्गावरील अवजड वाहनांमुळे हा रस्ता कितपत तक धरेल? अशाप्रकारे पावसाळ्यात काम करून नेमके प्रशासन काय साधत आहे? जनतेचा पैसा यामुळे वाया तर जात नाही ना असा असे विविध सवाल नागरिकांतून उपस्थित केले जात आहेत











