अहमदाबाद येथील भीषण विमान अपघात मन सुन्न करणारा : आमदार निलेश राणे

मालवण | प्रतिनिधी : अहमदाबाद येथे घडलेला भीषण विमान अपघात मन सुन्न करणारा आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत अनेक निष्पाप जीवांनी आपला जीव गमावला. या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अश्या दुःखद भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केल्या आहेत.

ही घटना केवळ एक अपघात नसून, अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचे दुःख घेऊन आलेली आहे. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, जी अत्यंत वेदनादायक आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर पूर्ण बरे वाटावे, त्यांना मानसिक आणि शारीरिक बळ मिळावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अश्या भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केल्या आहेत.