चुका करणाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा सुधारणा करून प्रवाशांना सुविधा देण्यासाठी काम करणार :- आमदार निलेश राणे

कुडाळ एस. टी. बस आगारासाठी दाखल झालेल्या पाच लाल परी बसचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाला संपन्न

कुडाळ l प्रतिनिधी :कुडाळच्या एस. टी. बस स्थानकामध्ये काय चुका झाल्या त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आता सत्ता आपली आहे त्यामुळे प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्याची जबाबदारी आपली आहे त्या सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्या सुधारणा करण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील ‘लाल परी’ लोकार्पण सोहळावेळी दिले.

कुडाळ एसटी बस आगाराला प्राप्त झालेल्या ५ लाल परी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ एस. टी. बस स्थानक येथे संपन्न झाला. यावेळी यंत्र अभियंता सुजित डोंगरे, विभागीय स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे, कुडाळ एस टी बस आगार प्रमुख रोहित नाईक, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस तालुकाप्रमुख दीपक नारकर, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, शहर प्रमुख ओंकार तेली, संघर्ष समितीचे निलेश तेंडुलकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, पावशी सरपंच वैशाली पावसकर, रेवती राणे, आबा धडाम, संजय भोगटे, सुनील बांदेकर, राकेश कांदे, वाहतूक निरीक्षक पल्लवी मोरे आदी उपस्थित होते.

 

या लोकार्पण सोहळावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, कुडाळ एस. टी. बस आगाराच्या अनेक समस्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे‌. ही सेवा प्रवाशांसाठी मिळते. त्यामुळे ती सेवा चांगल्या प्रकारे मिळावी ही आमची धारण आहे. त्यामुळेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आमच्या मागण्या दिल्या आहेत. अजून ज्या काही मागणी आहे त्या पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करत राहीन. ज्यांनी चुका केल्या आहेत त्याच्यावर टीका करण्यापेक्षा त्या सुधारणा करण्यावर मी भर देणार आहे.

 

कुडाळ शहर २१ व्या शतकातील करणार

 

कुडाळ शहरांमध्ये अनेक समस्या आहे सर्वात मोठी समस्या ही वाहतूक कोंडीची आहे ही समस्या सोडवण्यासाठी पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नगरपंचायत यांच्या बैठक घेऊन वाहतूक कोंडीचे नियोजन केले जाणार असे सांगून अभिमन्यू हॉटेल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. यासाठी काँक्रीटीकरण रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच कुडाळ पोलीस ठाणे येथे असलेल्या शासकीय जागेमध्ये सुशोभीकरण करण्याचा आमचा मानस आहे. हे शहर एकविसाव्या शतकातील दिसलं पाहिजे, वाटलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगून पिंगुळी पर्यंत जाणारा रस्ता सुद्धा रुंदीकरण केला जाणार आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक महादेव आंबेस्कर यांनी केले.

 

 

आमदार निलेश राणे यांनी केला एस. टी‌. बसचा प्रवास

 

कुडाळ एस. टी. बस आगाराला मिळालेल्या ५ लाल परी बसा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी या लाल परी बस मधून एसटी बस स्थानक ते कुडाळ पोलीस ठाण्यापर्यंत प्रवास केला यामध्ये कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.