श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ कार्यकारिणीची पुनर्रचना

दिलीप भालेकर अध्यक्षपदी कायम

कुडाळ: श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ, सिंधुदुर्ग यांच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा रविवार, ८ जून २०२५ रोजी कुडाळ येथे उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भालेकर होते. यावेळी मोठ्या संख्येने परीट ज्ञातीबांधव उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली, ज्यात श्री. दिलीप भालेकर यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपस्थित सर्व ज्ञातीबांधवांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

* अध्यक्ष: श्री. दिलीप भालेकर, सावंतवाडी

* उपाध्यक्ष: श्री. किरण चव्हाण (मालवण), श्री. विलास साळसकर (देवगड), श्री. प्रसाद पाटकर (वेंगुर्ला), श्री. नागेश कुडाळकर (कुडाळ), श्री. तातू कडू (वैभववाडी), श्रीम. धनश्री चव्हाण (कणकवली)

* सचिव: श्री. अनिल शिवडावकर, कुडाळ

* सहसचिव: श्री. गुरुनाथ मडवळ, वेंगुर्ला

* खजिनदार: श्री. संदिप बांदेकर, सावंतवाडी

* सहखजिनदार: श्री. अशोक आरोलकर, वेंगुर्ला

* सदस्य: श्री. संजय होडावडेकर (सावंतवाडी), श्री. रितेश चव्हाण (सावंतवाडी), श्री. संदिप कडू (वैभववाडी), श्री. विनायक चव्हाण (मालवण), श्री. किरण कुणकेश्वरकर (देवगड), श्री. गणेश शिवडावकर (कणकवली)

* पदसिद्ध सदस्य: श्री. राजेंद्र भालेकर (सावंतवाडी), श्री. महेंद्र आरोलकर (वेंगुर्ला), श्री. मोहन वालकर (मालवण), श्री. सदानंद अणावकर (कुडाळ), श्री. विजय पाटील (देवगड), श्री. शेखर कडू (वैभववाडी), श्री. भालचंद्र करंजेकर (कणकवली), श्री. श्रीकृष्ण परीट (दोडामार्ग)

या पुनर्रचित कार्यकारिणीमुळे संघाचे कार्य अधिक गतीने पुढे जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.