माजी नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे यांचे न. प. प्रशासनाला निवेदन
राजापूर l प्रतिनिधी : राजापूर शहरातील प्रमुख रस्त्यासह अन्य भागातील रस्त्यांवर मोठया प्रमाणावर पडलरेले खड्डे तातडीने दुरूस्त करावेत अशी मागणी राजापूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे यांनी केली आहेत. याबाबतचे एक निवेदन त्यांनी नगर परिषदेकडे दिले आहे.
राजापूर शहराला जोडणारे प्रमुख मार्ग सध्या अतिशय खड्डेमय झालेले आहेत. यावर्षी अवकाळी पावसामुळे नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागली आहे. अजून संपूर्ण पावसाचा हंगाम सुरु झालेला नाही. त्यामुळे पुढे या रस्त्यांची दयनीय अवस्था होणार आहे. त्यामुळे नागरिकांची जिवित व वित्तीय हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पादचाऱ्यांना खड्ड्यातील साचलेल्या पाण्यामुळे देखील त्रास होत आहे.
तरी शहरातील जवाहर चौक ते तालीम खाना मार्गावरील कुशे मेडीकल व आंबेडकर भवन, महापुरुष घुमटी ते बलबले मशीद पर्यंत, नन्हेसाहेब पुल ते हळदवणेकर घर, कोंडेतह येथील NH-६६ ते पेणकर घर या मार्गावरिल खड्डे भरण्याची मागणी या निवेदनाने एड. खलिफे यांनी केली आहे. नगर परिषदेचे कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव यांच्याकडे हे निवेदन एड. खलिफे यांनी दिले आहे.












