मनसेकडून सावंतवाडीत राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त १ हजार रोपांचे वाटप

सावंतवाडी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहरात मनसेच्या वतीने एक हजार झाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे दरवर्षी एक हजार झाडांच्या रोपांची लागवड करण्याचा उपक्रम राबवते, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम सावंतवाडी शहरात घेण्यात आला.

यावेळी सावंतवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी मनसेकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, उप जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर, बांदा तालुका अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर, तालुका सचिव सतीश आकेरकर, काशीराम गावडे, श्रीराम सावंत, अभिमन्यू गावडे यांच्यासह मनसेचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.