अहमदाबाद अपघातातील मृत व्यक्तींना रत्नागिरी शहर भाजपातर्फे श्रद्धांजली 

रत्नागिरी : अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टीतर्फे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून मृतात्म्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थना केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठीही सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

 

कार्यक्रमाला महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.