खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील तळे कासार वाडी येथे एक नुकताच दहावी पास झालेल्या एका किशोर वयीन विद्यार्थ्यांचा विंचूदंशाने उपचारादरम्यान मृत्यू झाल्या प्रकरणी तळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर च्या चौकशी चे आदेश देण्यात आले आहेत .
सोहम मंगेश शिर्के (वय-१६) या विद्याध्यचि विंचूदंशाने उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे सुमारास मृत्यू झाला आहे. ११ जून रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान विंचू दंश झाला होता यावेळी त्याला घरच्यांनी तातडीने तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र यावेळी तळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या सगळ्ळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चोकशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथील सोहम मंगेश शिर्के (वय १६) या विद्यार्थ्यांचे विंचू दंशाने उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे सुमारास मृत्यू झाला आहे. सोहम शिर्के याला ११ रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान विंचू दंश झाला होता. त्याला नातेवाईकांनी नजीकच्या तळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले. मात्र यावेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला प्रथमोपचार करून कळबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला डेरवण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोहम शिर्के हा तळे हायस्कूल येथून यावर्षी दहावी उत्तीर्ण झाला होता.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी तातडीने गंभीर दाखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी तळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या त्यावेळी अनुपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती खेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमील यांनी दिली आहे.
याप्रकरणी प्राथमिक चौकशीत घरच्यांनी त्याला आधी खेड येथील खाजगी रुग्णालय नेले व पुन्हा कळवणी रुग्णालय नेले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला डेरवण येथे नेण्यात आले यामध्ये खूप वेळ गेला, अशीही माहिती डॉ. खरटमील म्हणाले. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. तसेच आरोग्य विभागाकडूनही याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पावसाळा सुरू होण्या अगोदर आपत्कालीन आढाव्याच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य विभागालाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात येतात. दुर्दैवाने अशी कोणतीही घटना घडल्यास त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस व वैद्यकीय अधिकारी उपस्थित असावेत, अशाही सूचना वेळोवेळी दिल्या जातात मात्र तळे आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याचे प्रकरण समोर आल्याने या सगळ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.










