चिपळूण अपडेट्स :
Date – 16.06.2025 ; Time- 3:00 PM
चिपळूण :
सध्याची वशिष्ठी नदीची पातळी ३.६८ मी म्हणजेच इशारा पातळीच्या ( ५ मी.) खाली आहे. पाणी कमी होत आहे. कोळकेवाडी धरणाची पातळी १३३.३५ मी आहे. पातळी निम्नतम स्तरावर म्हणजेच १३२.५० मी वर आणण्याकरीता कोळकेवाडी धरणाच्या एका मशिनद्वारे विदयुतनिर्मिती सुरू आहे. वशिष्ठी नदीची पाणी पातळी कमी होत असल्याने एक मशीन सुरू ठेवण्यात आलेली आहे. दुपारी ३ः४५ वा ४.०९ मी उंचीची भरती आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे.











