खंडाळा l वार्ताहर र् आज 16 जून शाळेचा पहिला दिवस वरून राजा लहान मुलांच्या स्वागताला हजर होता. शाळेतील मुलांची छत्री नवीन,गणवेश नवीन, दप्तर नवीन,चप्पल नवीन यातच स्वागताला सागरी पोलीस ठाणे जयगड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कुलदीप पाटील साहेब, या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा जांभारी नंबर एक ला भेट दिली या भेटीनिमित्त नवीन मुलांचे स्वागत श्री पाटील साहेब यांनी केले. यावेळी पाटील साहेब म्हणाले की मराठी माध्यम मध्ये शिकलेली मुले आज मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत शिक्षण हे प्रगतीचे प्रतीक आहे गुरुजी च्या शिकवणीमुळे संस्काराची शिदोरी या वयात मुले आत्मसात करतात. आपण कितीही मोठे झालो तरी आई वडील गुरुजी यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. यावेळी शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तक गणवेश वाटप करण्यात आला. या वेळी हेड कॉ. शिंदे,जांभारीचे सरपंच आदेश वासावे, पालक वर्ग व शिक्षक वर्ग उपस्थित होते











