रत्नागिरी : वार्ताहर
दापोली जालगाव ग्रामपंचायत येथील दापोली दाभोळ मार्गावर मोठे झाड सकाळी साडे सातला पडल्याने वाहतूक खोळंबली होती. सकाळी साडेआठला झाड बाजूला केल्याने राज्यमार्ग 97 157/00 वाहतुक सुरळीत झाली
जयवंत गणपत वाडकर, निगळेवाडी यांच्या घराजवळ बांध कोसळून घराच्या बाजूला आला आहे,कोणते जीवित आली नाही
मौजे घाटीवळेच्या सुनिता सिताराम जाधव यांच्या घरासमोरील चिऱ्याची भिंत कोसळली, कोणती जीवितहानी नाही.
मौजे घाटीवळे येथील दीपक जाधव यांच्या घरासमोरील संरक्षण भिंत कोसळली कोणतीही जीवितहानी नाही, अंदाजे 30 हजाराचे नुकसान.
मौजे फणसाठ येथील राजाराम भोसले यांच्या घराशेजारी संरक्षण भिंत 25 फुट लांब व 5 फूट उंच कोसळून अंदाजे 25 ते 30 हजार रुपयाचे नुकसान झाले
मौजे शेंबवणे येथील महादेव वाडीतील बबन बने यांच्या अंगणातील झाड पाऊस व वाऱ्यामुळे घरावर पडून त्यांच्या घराचे अंदाजे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले
मौजे पाडगाव पठारवाडी येथील आज सकाळी पाच वाजता धोंडीराम बारक्या खेडेकर यांच्या घरावर फणसाचे झाड पडले आहे कोणतेही जीवित हानी नाही नुकसान अंदाजे 30 हजार.












