जेष्ठ व्यावसायिक विनायक तुळसुलकर यांचे निधन

सावंतवाडी : शहरातील सबनीसवाडा येथील रहिवासी विनायक उर्फ मोहन दत्तात्रय तुळसुलकर ( वय ७२ वर्षे) यांचे रविवारी (ता.१५ जून) सकाळी साडेअकराच्या सुमारास गोवा बांबोळी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. पूवीँ मुंबई मध्ये खासगी नोकरी करणारे विनायक उर्फ मोहन नंतर सावंतवाडीत आले. इथेच त्यांनी फणसाण, चिवडा, लाडू बनविण्याची भट्टी सुरु केली. या व्यवसायात जम बसवला. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.