माजी आमदार डॉ.राजन साळवी म्हणजे सर्व सामन्यांचे नेतृत्व

कार्यकर्त्याच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी गाठले थेट विरार 

चिपळूण (वार्ताहर) : शिवसैनिकांच्या सुख दुःखात नेहमीच सामील होऊन त्यांच्या समस्या सोडविणारे राजापूर लांजा विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांच्या वाढदिवसासाठी चक्क रत्नागिरीतून थेट विरार गाठले. त्यांच्या या आपुलकीच्या स्वभावामुळेच ते आपला हक्काचा माणूस म्हणून परिचित आहेत.

 

चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक साहिल पवार हे माजी आमदार राजन साळवी यांचे जवळचे विश्वासू कार्यकर्ता आहेत. जशी माजी आ. साळवी यांनी माणसे जपली . अगदी तसेच कार्यकर्तेही जपले. म्हणूनच साहिल पवार यांच्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस मुंबई विरार येथे असतानाही माजी आ. राजन साळवी यांनी थेट रत्नागिरीतून विरार गाठले. त्यांनी वाढदिवसाला जाऊन मुलाला आशीर्वाद दिले.

राजन साळवी विरार येथे दाखल असल्यावर त्यांचे चाहते आणि शिवसैनिक यांनी त्यांना भेटायला कार्यक्रम स्थळी गर्दी केली होती. साहिल पवार यांनीही माजी आमदार राजन साळवी यांचे विरारला आल्याबद्दल आभार मानले.