देवगड पोलिस ठाण्याच्या दामिनी पथकाची आदर्श शाळेला भेट, विद्यार्थ्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’ बाबत मार्गदर्शन

देवगड : देवगड पोलिस ठाण्याच्या दामिनी पथक यांनी आज आदर्श शाळा, देवगड सडा येथे भेट दिली. शाळेच्या वतीने दामिनी पथकाचे स्वागत करण्यात आले.

 

या वेळी महिला पोलिस पथकातील श्रीम. कदम यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना गुड टच आणि बॅड टच या महत्त्वाच्या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.