दिनांक १३ ते १६ या जून या कालावधीत पावसामुळे ७ लाख ७८ हजार ४०० रुपयांचे नुकसान
लांजा (प्रतिनिधी) पावसाने लांजा तालुक्यात एकच दाणादाण उडवली असून १३ ते १६ जून या कालावधीत पडलेल्या पावसाने एकूण ७ लाख ७८ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे .
मे महिन्यात धुवाॅंधार कोसळलेल्या पावसाने
जून च्या पहिल्या आठवड्यात काहीशी उसंत घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मात्र जोरदार आघाडी घेत तालुक्यात घरेगोठे यांचे प्रचंड नुकसान केले आहे .दिनांक १३ ते १६ जून या कालावधीत पडलेल्या पावसाने लांजा तालुक्यात मोठी हानी केली आहे .यामध्ये पावसामुळे उपळे येथील चंद्रकांत वीर यांच्या गोठ्याचे २० हजार, संजय सुर्वे -भडे यांच्या गोठ्याचे २ लाख ८८ हजार त्याचप्रमाणे वाडीलिंबू येथील पांडुरंग मोरे यांच्या गोठ्याचे ३१ हजार तर कोट आगरगाव येथील तुकाराम गोरुले यांच्या गोठ्याचे ४८ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे
लांजा शहरातील श्रीरामपूल येथे राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार कंपनीने तयार केलेल्या पर्यायी मार्गामुळे येथील वहाळाला आलेल्या प्रचंड पुराचे पाणी घरात घुसून लांजा शहरातील श्रीमती ईसानी यांच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू,तांदूळ, गहूपीठ याबरोबरच फ्रीज, बेड, बेडवरील गाद्या यांचे एकूण सुमारे २५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे .
लांजा तालुक्यात घरांची पावसामुळे अतिवृष्टीमुळे घरात पाणी घुसून देखील मोठ्या प्रमाणात अनेकांचे नुकसान झाले आहे यामध्ये शांताराम चव्हाण पनोरे यांचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गीतांजली मोरे -पनोरे यांचे ४४ हजार २००, शिवराम मोरे -पनोरे यांचे २७ हजार रुपये, भागीरथी मौर्य- पनोरे यांचे २०००० रुपये , नारायण नरसले पनोरे यांचे १७ हजार ४००, अनिकेत नरसले- पनोरे यांचे ६८हजार रुपये, सचिन नरसले- पनोरे यांचे ३८ हजार रुपये नुकसान झाले आहे. प्रतिभा नरसले यांचे १४ हजार रुपये नुकसान झाले आहे.लक्ष्मण सोनू तरळ -साटवली यांचे १४,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कृष्णा सदू तरळ- साटवली यांचे ४१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच सचिन तरळ -साटवली यांचे ३४,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पुनस येथील सुरेंद्र भागवत यांचे ८६०० रुपयांचे नुकसान झाले आहे .त्याचप्रमाणे गोळवशीतील रमेश वीर यांचे ३८०० रुपयांचे नुकसान झाले आहे .
अशाप्रकारे चार गोठ्यांचे मिळून ३ लाख ८९ हजार ७०० रुपये तर १३ घरांची एकूण ३ लाख ६५ हजार २०० रुपयांचे झाले आहे. पावसाने एकूण ७ लाख ७८ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे .
या सर्व नुकसानीची नोंद लांजा महसूल विभागात करण्यात आलेली आहे












