मेर्वी जि.प.प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत मुलांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात 

गावखडी /वार्ताहर :रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी जि.प.प्राथमिक सेमी इंग्रजी

शाळा मेर्वी गुरव वाडी येथे मुलांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम मुलांच्या प्रवेशाच्या वेळी सौ.अनुश्री अभ्यंकर यांनी सर्व मुलांना ओवाळणी केली.त्यानंतर सर्व मुलांना पुष्प देऊन स्वागत करुन मुलांना लाडू देऊन त्यांनच तोंड गोड करण्यात आले.नंतर गणेश वितरीत, मोफत वह्या वाटप करुन प्रभात फेरी साठी सर्व मुले, शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.दिप्ती पावसकर, उपाध्यक्ष सौ.प्रियांका पावसकर,शिक्षक पालक संघ अध्यक्ष सौ.नीरजा म्हादये, उपाध्यक्ष सौ.समिक्षा कुरतडकर, अंगणवाडी सेविका सौ.सत्यश्री खर्डे मॅडम, मदतनीस सौ.स्नेहा कुरतडकर मॅडम,पालक सदस्य ‌ श्री योगेश पावसकर,माता पालक सदस्या सौ.अनुश्री अभ्यंकर, तसेच अंगणवाडी माता पालक अध्यक्षा सौ.प्रांजल मेस्त्री,माता पालक सदस्या सौ.वर्षा खर्डे,सौ.दिक्षा गुरव,सौ.सृष्टी पेटकर, सौ.कोंडवे वहिनी, स्वपांकिन श्रीम.शारदा ताई गुरव आणि शिक्षक मा.श्री.मसरत शेख सर ,शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री . संतोष मुडे सर उपस्थित होते.अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात मुलांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला.