खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी येथे , पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत आलेल्या ४ फुट मगरीला पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात वनविभाग व छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशन च्या रेस्क्यू सदस्यांना यश आले आहे.
गेले ३ दिवस मुसळधार पाऊस असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. यातच नदीतील मगरी पाण्याच्या प्रवाहा मुळे मानवी वस्ती जवळ येत असतात. यातच १७ जुन रोजी रात्री ११ च्या सुमारास ४ फुटाची भली मोठी मगर चिंचघर प्रभुवाडी मधील ग्रामस्थांना आढळून आली. तात्काळ त्यांनी वनविभागाशी संपर्क केला. वनविभागाची रेस्क्यू टिम तात्काळ घटनास्थळी पोहचली व त्या मगरीला व्यवस्थीत रेस्क्यू करून तिची वैद्यकीय चाचणी करून तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त केला.
या रेस्क्यू मध्ये छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशन चे , सुरज जाधव सर्वेश पवार, श्वेत चोगले, रोहन खेडेकर यांच्या सह वनविभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. हा संपूर्ण रेस्क्यू रेंज फॉरेस्ट आँफिसर श्री. प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण झाला.













