प्रा ॲड दिलीप चव्हाण यांनी सुखदर शाळेत घेतली कार्यशाळा

खेड : सिद्धयोग लॉ कॉलेजचे प्राध्यापक ॲड दिलीप चव्हाण यांनी सोमवार दि. 17 रोजी खेड सुखदर येथील प्राथमिक शाळेत जाऊन इयत्ता 1 ली ते 7 वि च्या विध्यार्थ्यांना “स्वतः चा अभ्यास स्वतः कसा करावा आणि व्यक्तिमत्व विकास ” या विषयी कार्यशाळा घेतली.

शालेय जीवनात संस्कार आणि अध्ययन या दोन शब्दांना फार महत्व आहे. बाल्यावस्थेच्या कालखंडात मुलांवरती जे संस्कार होतात, ते त्यांच्या मनावर कायम स्वरुपी कोरले जातात. कारण मानसशास्त्र सांगते की, बाल्यावस्था ही संस्कारमय कालखंड अवस्था आहे. या सर्व बाबी लाज घेत सिद्धयोग लॉ कॉलेज खेडचे प्रा ॲड दिलीप चव्हाण यांनी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना स्वतःचा अभ्यास स्वतः च कसा करावा आणि व्यक्तिमत्व विकास कसा घडवून आणला पाहिजे यावर मार्गदर्शन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी त्यांनी खेड सुखदर येथील प्राथमिक शाळेत जाऊन स्वतः याबाबत मुलांना माहिती दिली. यावेळी मुलांनी सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद दिला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. महाले यांनी चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.