लांजा महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि माजी विद्यार्थी असोसिएशन यांचा संयुक्त उपक्रम
लांजा (प्रतिनिधी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांजा,
आय.क्यू. ए.सी. ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि माजी विद्यार्थी असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने
एक पाऊल समृद्ध पर्यावरणाकडे हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमांतर्गत , शासनाच्या निर्देशानुसार सिंगल युज प्लास्टिक वापरवर बंदी आहे ही बाब लक्षात घेता कागदी किंवा कापडी पिशवी वापरणे पर्यावरणाला अनुसरून आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने किमान २५ पेपर बॅग किंवा स्वतः शिवलेल्या कापडी पिशव्या १५ जून पर्यंत एन. एस. एस. विभागामध्ये जमा करावयाच्या आहेत. खूप छोट्या पेपर बॅग असू नयेत एवढी काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी . जमा केलेल्या कागदी किंवा कापडी पिशव्यांचे वितरण १५ जून नंतर लांजा बाजारपेठेमध्ये केले जाणार आहे.
माजी विद्यार्थी असोसिएशन यांच्या वतीने महेश सप्रे यांचेकडून त्यांचे वडील कै. हरी शंकर सप्रे यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शंभर वडाची रोपे वितरित करण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी वडाची निगा राखतील, वडाचे संवर्धन करतील आणि ज्यांच्याकडे जागा उपलब्ध असेल अशा विद्यार्थ्यांनी आपली नावे प्रा.प्राची बामणे यांचेकडे द्यायची आहेत.
या उपक्रमामध्ये आपण उत्स्फूर्त सहभाग घेऊन समृद्ध पर्यावरणाच्या दिशेने आपले एक पाऊल टाकूया, असे आवाहन लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य
अरविंद कुलकर्णी व उपप्राचार्य के.आर.चव्हाण यांनी केले आहे.












