पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल पणदेरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न ..

मंडणगड | प्रतिनिधी :. मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल पणदेरी येथे आज 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री गवारी सर यांनी दैनंदिन जिवनातील योगाचे महत्व सांगितले. त्या नंतर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. वाकचौरे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना उभे व बैठे योगा प्रकार करून दाखविले. सर्व विद्यार्थी व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील सर्व योग प्रकार केले. प्रत्येक योग प्रकारानंतर श्री. वाकचौरे सर यांनी त्या प्रकारचे शरीराला होणारे फायदे विषद केले. कार्यक्रमाचा समारोप श्री.इंगळे सर यांनी केला

कार्यक्रमासाठी शाळेचे लिपिक श्री. पालकर भाऊ, शिपाई हीलम भाऊ , मदतनीस पालकर काकी आदी मान्यवर उपस्थित होते.