रत्नागिरी बसवलेला वेव्ह रायडर बोया तांत्रिक बिघाडामुळे सहकार्याचे मच्छिमार बांधवांना आवाहन
उपकरण सापडल्यास कळवण्याचे आवाहन
रत्नागिरी: भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र, (ईनकाइस), भू-विज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि जी. एम. वेदक महाविद्यालय, तळा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी च्या भगवती जेटी आणि भाटे समुद्राच्या जवळ समुद्रातील हालचालींची माहिती देणारे तरंगते उपकरण त्सुनामी, फयान, वादळ, वारे इत्यादी समुद्रातील संभाव्य हवामान अंदाज देणारे “वेव्ह रायडर बोया” हे तरंगते उपकरण काही दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांची माहिती मिळत नाही तसेच जी. पी. एस. बंद आहे.
जर तो हवा आणि लाटा मुळे बसवलेल्या ठिकाण पासून स्थलांतरित झाला आणि किनाऱ्यावर येऊन लागला तर त्याची माहिती देण्यात यावी हि विनंती. हे तरंगते उपकरण मच्छिमार बांधवांसाठी मासेमारी करण्यासाठी जाताना आणि येताना तसेच त्याची माहिती किनारपट्टीवरील लोकासाठी उपयुक्त असे हे उपकरण आहे तरी जर हा बसवलेल्या ठिकाण पासून सथालांतर झाला तर त्याची माहिती प्रकल्प अधिकारी डॉ. बी. जी. भवरे (मो. 9822620421) आणि श्री. भरत कुमार (ईनकाइस मो. 08121317194) यांच्याशी संपर्क साधावा हि विनंती












