जाकादेवी येथे आंबा बागेत काम करणाऱ्या कामगाराने विषारी औषध केले प्राशन

रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील जाकादेवी येथे आंबा बागेत काम करणाऱ्या कामगाराने अज्ञात कारणातून गवत मारण्याचे औषध प्राशन केले. उपचारांदरम्यान त्याचा शनिवार 21 जून रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

भानूप्रसाद रामनिवास चौहान (28, मूळ रा. उत्तर प्रदेश सध्या रा. जाकादेवी, रत्नागिरी ) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. भानूप्रसाद याने 17 जून रोजी जाकादेवी येथे अज्ञात कारणातून गवत मारण्याचे औषध प्राशन केले होते. त्याच्या नातेवाकांनी त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना 21 जून रोजी दुपारी भानूप्रसादचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे