शिवतर नामदरेवाडी रस्त्याला धोकादायक भेगा; वर्षभरापासून वाहतूक ठप्प

 नागरिकांची दोन किलोमीटर पायपीट कायम
 धरणाकडील बाजूने संरक्षण भिंत हा एकमेव पर्याय; ग्रामस्थांचे मत

चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील शिवतर नामदरेवाडी रस्त्यावर १९ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याला भेगा पडल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून या मार्गावरील व प्रवासी वाहतूक बंद असून नागरिकांना २ कि.मी. पायपीट करावी लागत आहे. शिवतर कोडबा धरणाच्या कामासाठी रस्त्याच्या न खालील बाजूची माती काढण्यात आली होती. यामुळे याआधीच रस्ता वाहून गेला असून आता पुन्हा या रस्त्याच्या भेगा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा करत आहेत. नामदरेवाडीतील सुमारे ७० घरे आणि न शेतीला धोका निर्माण झाला आहे. यावर ठोस उपाययोजना न झाल्यास १५ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेचे सचिव सुनील मोरे व ग्रामस्थ मयुर नलावडे यांनी दिला आहे.
स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष
शिवतर नामदरेवाडी रस्त्याच्या खालील बाजूने धरणाच्या कामासाठी माती काढण्यात आल्यामुळे हा रस्ता पुढील दोन चार वर्षात वाहून जाईल खचेल, याची लेखी तक्रार आम्ही शासनाकडे दिली होती. तरी देखील प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. आता नामदरेवाडी रस्त्याला मोठ मोठे तडे गेले असून रस्ता कोणत्याही क्षणी वाहून जाईल. सदरचे तडे धरणाकडे वळणाऱ्या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत धरणाच्या कामासाठी माती काढण्यात आल्यामुळे गेले आहेत, असा आरोप तक्रारदार ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच धरण बांधण्यामागे भूगर्भातील आणि बाह्य जलसाठा वाढविणे हा उद्देश आहे. मात्र, माती वारंवार धरणात वाहून आल्यास धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होऊन मूळ उद्देशच बाजूला राहिल. तसेच शिवतर नामदरेवाडी रस्त्याच्या धरणाकडील बाजूस संरक्षक भिंत न बांधल्यास धरण बांधताना करण्यात आलेल्या चुकांमुळे दर दहा ते बारा वर्षांनी आम्हाला वरच्या बाजूने पर्यायी रस्ता मागत फिरावे लागेल,असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे धरणाकडील बाजूने संरक्षक भिंत हा एकमेव पर्याय आहे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.