विधी सेवा समितीच्यावतीने दापोलीत योग शिबीर उत्साहात

दापोली l प्रतिनिधी: विधी सेवा समितीच्या वतीने दापोली शहरातील दापोली शिक्षण संस्थेच्या ए. जी. हायस्कूल येथील माधवराव कोकणे सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांकरिता योग शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले.

 

यावेळी दापोलीतील ज्येष्ठ योग मार्गदर्शिका हर्षदा डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना योगासनांबद्दल सखोल माहिती दिली. तसेच योगासनांची प्रात्यक्षिके करून विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली.

 

यावेळी दापोली शिक्षण संस्थेचे योगशिक्षक शैलेश आठल्ये व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला शाळेचे उप मुख्याध्यापक अर्जुन घुले, पर्यवेक्षक शामराव पेठकर, शालेय समिती अध्यक्ष रवींद्र कालेकर, दापोली न्यायालयातील वरिष्ठ लिपीक आदिती भिडे तसेच विधी सेवा समिती सदस्य मनोज पवार, बाजीराव पवार, जितेंद्र पवार, अथर्व बाक्कर यांच्यासह निरंजन शिगवण, सई शिगवण, प्रथमेश दाभोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात दापोली ए. जी. हायस्कूल येथील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.