जि. प. आदर्श शाळा वायंगणी येथे शाळेच्या माजी विद्यार्थांकडून शैक्षणिक साहित्य वाटप 

गावखडी /वार्ताहर :    वायंगणी गावातील माजी विद्यार्थी शैलेश शिंदे, प्रतिक भोवड, अमित उबारे, संतोष पावसकर, निखिल शिंदे, नरेश पावसकर प्रवीण घाणेकर यांनी शाळेतील मुलांच्या गरजा ओळखून त्यांना वह्या, चित्रकलेचे साहित्य अशाप्रकारे शैक्षणिक साहित्य वाटप केले.

या माजी विद्यार्थांनी केवळ शाळेतील मुलांनाच नाही तर गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांना देखील चित्रकला वही व अन्य साहित्य दिले.

गावातील माजी विदयार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी माजी विद्यार्थांनी शाळेतील मुलांना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा ही दिल्या.

या प्रसंगी माजी विध्यार्थी, तसेच शाळेतील मुख्याध्यापिका माळी मॅडम, उपशिक्षिका सौ आदिती सावंत अंगणवाडी ताई सौ.लिंगायत मॅडम, मदतनीस श्रीम. घवाळी मॅडम व अन्य उपस्थित होते.