अनारी येथे माजी विद्यार्थ्याकडून शाळेला पाच CCTV कॅमेरे भेट

 ४३ वर्षांनी सर्व वर्गमित्र एकत्रित भेटले

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील अनारी गावच्या सन १९८२/८३ च्या इयत्ता ७ वी च्या Batch ने अनारी शाळेला ५ CCTV कॅमेरे भेट दिले. ४३ वर्षांनी ही इयत्ता ७ वी ची Batch “ आम्ही सारे सवंगडी- कृतज्ञता आणि गुरुजनांचा सन्मान सोहळा “ या शीर्षकाखाली अनारी शाळेमध्ये नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमामध्ये हे ५ CCTV कॅमेरे आणि विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो, सवरलो, घडलो आणि मोठे झालो, त्या शाळेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि ज्या गुरुजनांनी आम्हाला सुसंकृत केले त्या गुरुजनांच्या प्रती आदर, सन्मान आणि त्यांचे चरणस्पर्श व्हावेत या हेतूने प्रेरित होऊन आम्ही या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे यावेळी या Batch च्या माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालकांच्या छोटेखानी सभेमध्ये या शाळेचे माजी शिक्षक शांताराम कुंभार (कडवई,ता.संगमेश्वर) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना कुंभार गुरुजींनी सुमारे १ तास ४३ मिनिटे सभेला मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि, “मी स्वतःला भाग्यवान समजतो कि, अनारीसारख्या एका प्रगल्भ गावामध्ये मला शिक्षक म्हणून दिर्घकाळ काम करण्याची संधी मिळाली. या गावाने मला भरभरून प्रेम तर दिलेच, पण त्याहीपेक्षा अनेक गुणी विद्यार्थ्यांची फौज देखील मला याच गावातून मिळाली. आज माझे विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर आरूढ झालेले पाहताना मनस्वी आनंद होत आहे, शिवाय बऱ्याच वर्षांनी गावकऱ्यांचे दर्शन देखील झाले.” कुंभार गुरुजींनी आपल्या भाषणात अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या सभेला सरपंच सदानंद पवार यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गावच्या उपसरपंच सौ.वेदांती पवार, ग्रामपंचायत सदस्य संदिप पवार, स्नेहल शिर्के, सिमा पवार, माजी सरपंच शांताराम लाड, माजी सरपंच सौ.मेघा पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर पवार, उपाध्यक्ष सुशांत पवार, मुख्याध्यापक किशोर मोहिते, शिक्षक सतीश खताळ, गणेश वीर, श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.पुजा पवार, प्रदिप पवार आशा सेविका साक्षी जाधव, अंगणवाडी सेविका सोनाली पवार, मुंबई मंडळाचे विकास सावंत, महेंद्र कदम, नितिन पवार, संदेश पवार, संदिप कदम, माजी उपसरपंच जगन्नाथ पवार, मालाड (मुंबई) चे शिवसेना (उबाठा) शाखाप्रमुख व गावचे सुपुत्र रामचंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला १९८२/८३ च्या Batch चे माजी विद्यार्थी भरत जाधव, भरत पवार, गोपीचंद पवार, सदानंद ल.पवार, विजय दळवी, गजानन पवार, प्रभाकर गमरे, सुनिल पवार, राजेंद्र पवार, रविंद्र ज.कदम, कृष्णा द.जाधव, रविंद्र वि.कदम, विजय कदम, सविता पवार, वनिता पवार, शुभांगी पवार, वनिता देसाई, सुवर्णा पवार हे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन या शाळेचे माजी विद्यार्थी विजय कदम यांनी तर कार्यक्रमाची प्रस्तावना या शाळेचे माजी विद्यार्थी रविंद्र वि.कदम यांनी केली.