चिपळूण (वार्ताहर) : लेखक मिलिंद कदम यांना कोकण रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मृग साईधाम सहकारी गृहनिर्माण संस्था पागझरी चिपळूण यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मिलिंद कदम हे मृग साईधाम सोसायटीतील रहिवासी असल्याने सोसायटीसाठी ही बाब अभिमानाची असल्याचे संचालक मनोहर झगडे यांनी सांगितले.
या सत्कार समारंभप्रसंगी संचालक मनोहर झगडे, संचालक महेंद्र साळुंके, सोसायटी सदस्य गणेश सोनवणे, प्रताप देसले, भैय्या पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सर्व संचालकाच्या वतीने करण्यात आला. व मिलिंद कदम यांना भावी वाटचालीसाठी सोसायटीकडून शुभेच्छा देण्यात आल्या.














