खेड(प्रतिनिधी) शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि चिरणी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोहन मनोहर आंब्रे (वय ५३) यांचे १७ जून रोजी अपघाती निधन झाल्या प्रकरणी त्यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या दुचाकी स्वारावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आदित्य दिलीप मोरे वय-२० वर्षे रा.आंबडसपेठ, ता.खेड, असे त्या गुन्हा दाखल झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे या प्रकरणी फिर्यादी-उदय संभाजी भोसले, सपोफौ/६१६, खेड पोलीस ठाणे यांनी तक्रार दाखल केली
चिरणी येथे घराचे बांधकाम सुरू असल्याने १७ जून रोजी दुपारी ते बुलेटवरून लोटेच्या दिशेने निघाले असता, चिरणी पुलावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बाईकची जोरदार धडक बसली.
या भीषण अपघातात आंब्रे यांना गंभीर दुखापत झाली. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. अपघातानंतर तातडीने त्यांना चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर रत्नागिरी व त्यानंतर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद न देता, मंगळवारी १७ रोजी मध्यरात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.





