माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात उबाठा कडून ऑक्सिजन मशीन ची देणगी

गौरव पोंक्षे l माखजन :     संगमेश्वर तालुक्यातील माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवसेना ,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माखजन विभागाचे उपविभाग प्रमुख श्रीधर जोगळे यांनी पक्षाच्या वतीने ऑक्सिजन निर्मिती करणारे मशीन देणगी देऊ केली.

यावेळीमोफत विभागप्रमुख अनिल मोरे श्रीधर जोगळ,बाबू मोरे विजय कवळकर नितिन कवळकर माखजन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदिप शिंदे आणि कर्मचारी उपस्थित होते.

या पुर्वी सुद्धा माखजन विभाग शिवसेनेच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली होती. मोफत चष्मे वाटप करण्यात आले होते.

माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन निर्मिती करणारे मशीन मिळाल्याने परिसरातील अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे.