चिपळूण-कराड मार्ग बनला धोकादायक; रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतुकीस खुला करा

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांची मागणी

 

चिपळूण (वार्ताहर) : विजापूर-गुहागर १६६ राष्ट्रीय महामार्ग -चिपळूण कराड अत्यंत रस्त्याची दुदर्शा झाली असून वाहतुकीस अत्यंत निकृष्ट झाला आहे. संगमनगर ते पाटण १२ कि. मी. रस्ता अत्यंत धोकादायक पावसाने चिखलमय झाला आहे. या रस्त्याचे कंत्राटदाराने घेतलेले काम अत्यंत मंद गतीने व सावकाश केले जात आहे. २७ जून पर्यंत वाहतुकीस रस्ता बंद आहे. कुंभार्ली घाट, घाटमाथा पुढील हेळवाक पर्यंत रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. डोंगराच्या पाण्यामुळे रस्त्याचा बाजेगाव येथील पूलाचा भराव वाहून गेला.

डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत कंत्राटदारचे काम अत्यंत मंद गतीने चालल्यामुळे त्याचा सर्वांना फटका बसला आहे. छोटी वाहन मोरगिरी मार्गे अरुंद रस्त्याने सोडली जात आहेत. कुंभार्ली घाटातही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याची डागडूजी केली पाहिजे. संगमनगर, गोषटवाडी या भागातील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. कोकण- पश्चिम घाट जोडणारा महत्त्वाचा रस्ता वाहतुकीस खुला करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांनी केली आहे. एस.टी- गाड्या बंद असल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. महत्त्वाचा मार्ग योग्य पद्धतीने दुरुस्त करून या मार्गावर अपघात होणार नाहीत. याची दक्षता घ्यावी