खेड मध्ये ६० हजाराच्या गुटख्या सह मालवाहू टेम्पो जप्त ,एकजण अटकेत

खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गावर वेरळ नजीकच्या रेल्वे स्टेशन

रस्त्यावर पोलीस तपासणी मध्ये ६० हजार रुपये किमतीचा गुटखा वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पो सह एकास गजाआड करण्यात येथील पोलिसांना यश आले

 

 

खेडच्या दिशेने येत असताना वेरळ नजीक रेल्वे स्टेशन येथे वाहन तपासणी करताना वाहन बडा योद्धा अशोक लेलँड या टेम्पो ला पोलिसांनी हात दाखवून थांब्याकरीता सांगितले मात्र त्याकडे दुर्लक्ष करत टेम्पो भरधाव वेगाने निघून गेला

यावेळी कर्तव्य वर असलेले . उपनिरीक्षक येवले यांनी गाडीचा पाठलाग करून टेम्पो अडवून तपासणी केला असता असता गाडीमध्ये गुटखा आढळून आला.

 

सदर कारवाई पोलीस निरीक्षक नितीन भोयर व उपनिरीक्षक येवले यांनी करून मुद्देमाल जप्त केला. यामध्ये १४ पोती गुटखा असून प्रत्येक पोत्यामध्ये२२

पॅकेट असे एकूण तीनशे आठ पॅकेट होते. प्रत्येक पॅकेटची किंमत १९८ रुपये याप्रमाणे एकूण मुद्देमाल ६०,९८४ रुपये जप्त करण्यात आला व अशोक लेलँड ४ लाखाची गाडी असा एकूण ४ लाख ६० हजार ९८४ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या प्रकरणी अविनाश पारेकर असून वय वर्ष २१ राहणार बेवनूर यास जेरबंद करण्यात आले आहे . उपनिरीक्षक येवले यांच्यासह कॉन्स्टेबल तुषार झेंडे, प्रशांत माळी आणि हवालदार ठाकूर यांनी ही कारवाई केली