यशवंत विद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात

चिपळूण (वार्ताहर) : पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन धामणंद येथे मा मुख्याध्यापक एस. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजश्री शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी कुणाल सकपाळ. दिव्या कदम. वैदवी मोहिते. ध्रुवी चांदे काव्या जाधव या विद्यार्थिनींनी शाहू महाराजांचे जीवन कार्य विशद केले तसेच श्री.भोये, श्री.खाडे श्री.पालांडे, श्री. भांदिगरे श्री.कसबे, श्री.पोरे यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंत तर आभार भांदिगरे यांनी मानले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .