वालोटी नं.१ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील वालोटी नं.१ प्राथमिक शाळेत गावातील पुणे या ठिकाणी स्थायिक असलेले दिपक आंबेडे, शिवाजी आंबेडे, निलेश आंबेडे, अनंत आदवडे, दत्तात्रय आंबेडे, ज्ञानेश्वर कदम, सुरेंद्र पाटेकर, राहुल पाटेकर, दिपक कदम, रामचंद्र कदम, प्रकाश कदम, प्रतिभा तुपे, रामचंद्र येद्रे, सचिन वाघोले, नामदेव गोटल व सचिन आदवडे साठे सोपान श्रीम. प्रतिभा भाऊसाहेब, राकेश मिश्रा, व तोरणा राजगड परिसर समाजोन्नती पुणे यांच्या माध्यमातून शाळेतील ४० विद्यार्थ्यांना भरघोस शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पार्टी व पेन्सिल इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले.
गेली सलग चार वर्षे उदात्त भावनेतून वालोटी गावातील पुणेकर मंडळी, ग्रामस्थ व त्यांचे मित्र मंडळी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. तसेच शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी शाळेला आवश्यक असणारा संपूर्ण स्पीकर सेट शिवाजी आंबेडे व निलेश आंबेडे यांनी प्रदान केला. शालेय विद्यार्थ्यांची वर्गातील खेळांची गरज ओळखून राकेश मिश्रा यांनी शाळेला तीन कॅरम बोर्ड सेट प्रदान केले. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराची गरज ओळखून दिपक आंबेडे यांच्या प्रेरणेतून तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास, पुणे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप केले. पुणेकर मंडळी यांनी रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये यश संपादन केलेले वालोटी नं.१ शाळेचे माजी विद्यार्थी मयुरेश दिपक कदम व निधी विलास धुमक तसेच रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघातून खेळणारी वालोटी नं.१ शाळेची माजी विद्यार्थीनी श्रुती श्रीकांत आरवट या विद्यार्थ्यांचा शिल्ड, प्रशस्तीपत्रक व पुष्प देऊन यथोचित सन्मान केला. सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आराध्या कदम, उपसरपंच व स्थानिक प्राधिकरण सदस्य सचिनजी बामणे साहेब,दिक्षा कदम, प्रज्ञा कांगणे,प्रिया हळदणकर बाई आधी मान्यवर मंडळी उपस्थित होते. शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा तसेच शाळेच्या गरजा पूर्ततेसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू अशा प्रकारचं आश्वासन पुणेकर मंडळींनी दिलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष कादवडकर यांनी केले व कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन अजित कुरणे यांनी केले .