रत्नागिरी :मुंबई वेधशाळे कडून प्राप्त झालेल्या हवामानाच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता कायम असून वेधशाळेकडून एक जुलै पर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
त्यामध्ये 27 जून, 29 जून, 30 जून आणि 1 जुलै या कालावधीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.











