खेड रेल्वे स्थानकावर १ लाख ३० हजाराच्या  सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी !

खेड (प्रतिनिधी)
कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानक येथे एक प्रवासी महिला रेल्वेमध्ये चढत असताना तिच्याकडे असणाऱ्या पर्सची चैन खोलून १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या मंगळसूत्राची चोरी करून पोबारा केला आहे. हि घटना  २२ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ : ३० वाजताच्या सुमारास खेड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर घडली.
याबाबतची फिर्याद समृद्धी संदेश साळुंखे (वय-२६, रा. तळे मांडवे, ता. खेड, जि. रत्नागिरी, सध्या रा. नायगांव जूचंद्र, पो. चंद्रपाडा, ता. पालघर, जि. वसई ) यांनी येथील पोलीस स्थानकात उशिरा त‌क्रार दाखल केल्यानुसार पोलीसांनी . २६ जून २०२५ रोजी  अज्ञात चोरट्याविरोधात दाखल केला आहे.
खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार समृध्दी संदेश साळुंखे या स्वत:च्या  पर्समध्ये ४५ ग्रॅम १४० मिली वजनाचे १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे तीनपदरी मंगळसूत्र असलेली पर्स घेऊन रेल्वेमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने पर्सची चैन खोलून या मंगळसूत्राची चोरी करून पोबारा केला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.