खेडमध्ये गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर धाड

खेड (प्रतिनिधी) शहरातील कोष्टीआळी येथे एका झाडाखाली
येथील पोलिसांनी गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर धाड टाकून १ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
 शकील गफूर शेख (३८, खांबतळे-झोपडपट्टी, खेड) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी हस्तगत केली. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल शिरीष साळुंके यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.