हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा

खेड (प्रतिनिधी) विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू. विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी अशोक विश्राम यादव (४५, रा. मौजे जैतापूर-खेड) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तो शेवरीचा माळ येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना रंगेहाथ पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून १ हजार रुपये किंमतीची ५ लिटर दारू जप्त केली. पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत वाघ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.